Home /News /news /

कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मिरज शेवटचा थांबा

कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, मिरज शेवटचा थांबा

323rail_budget201404 जानेवारी : कोल्हापूर ते सांगली रेल्वे मार्गावर आज मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली या मार्गावरची रेल्वे वाहतूक पूर्ण पणे बंद होऊन प्रवाशांना गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे. आज मध्यरात्रीपासून उद्या (मंगळवारी) सकाळपर्यंत हा मेगाब्लॉक आहे. हातकणंगले जवळ रेल्वे मार्गावर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पुणे, मुंबईहून कोल्हापूरकडे येणार्‍या गाड्या या मिरजमध्येचं थांवबण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Kolhapur, Sangali, कोल्हापूर, मिरज, सांगली

पुढील बातम्या