मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोकण रेल्वे अपघातात आई गमावलेल्या समृद्धीला आलं अपंगत्व

कोकण रेल्वे अपघातात आई गमावलेल्या समृद्धीला आलं अपंगत्व

उदय जाधव,मुंबई.

09 मे :  रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळ झालेल्या, कोकण रेल्वे अपघातात अनेकांना कायमचं अपंगत्व आलं आहे. तीन वर्षाची समृद्धी नागती यापैकीच एक आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात तिचा डावा पाय गुडघ्यापासुन कापण्याची वेळ आली आहे. समृद्धा फक्त अपंगच झाली नाही तर या अपघातात तीने तिच्या आईला देखिल गमावलं आहे अशा या समृद्धाची ही करूण कहाणी...

चार मे रोजी नागोठणेजवळ दिवा सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक नाती कायमची दुरावली तर काहींना कायमचं अपंगत्व आलं आहे. तीन वर्षांची समृद्धा नागती त्यापैकीच एक. उन्हाळी सुट्टीत आई वडीलांसोबत गावाला आंबे फणस खाण्याच्या आवडीने ती निघाली होती, पण वाटेत नियतीने असा काही घाव घातला की तीची आई कायमची दुरावली तर वडील सायन हॉस्पीटलमध्ये जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. समृद्धीच्या आणखी दोन बहिणीही या अपघातात जखमी झाल्यात त्यांच्यावर रोहा आणि वाशी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघातात समृद्धीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यामुळे तीचा डावा पाय गुडघ्यापासुन कापावा लागला.

कोकण रेल्वे अपघातात समृद्धीने आपाला पाय तर गमावलाचं पण या अपघातात अनेकांची रक्ताची नाती कायमची दुरावली गेली. अपघातानंतर सरकारने लाखांचे चेक वाटले, पण ज्यांची नाती कायमची दुरावली आणि समृद्धी सारख्यांचे बालपण दुरावले ते परत येणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Railway, Railway accident, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर

पुढील बातम्या