19 ऑक्टोबर : निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकण...जसं हिरवं गार कोकण तसं इथलं राजकारण ही तसंच. त्यामुळे कोकणात कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. 2009 साली 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक जागा 6 जागा जिंकल्या होत्या. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने 5 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 2 आणि भाजप 1 तर शेकापने 1 जागा जिंकली होती. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नावा भोवती नेहमी कोकणच राजकारण फिरलं आणि वादातही राहिलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोकणची जनता कौल कुणाला ?
(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )प्रतिष्ठापणाला - दिग्गजांचा काय आहे निकाल ? 1) अलिबाग, रायगड
सुभाष पाटील, शेकाप - विजयी (76959)
महेंद्र दळवी, शिवसेना - पराभूत (60865)
2) श्रीवर्धन -रायगड
अवधूत तटकरे, राष्ट्रवादी -विजयी (61038)
रवींद्र मुंडे - शिवसेना -पराभूत (60961)
3) पेण -रायगड
रवी पाटील, काँग्रेस -पराभूत (60496)
धैर्यशील पाटील, शेकाप - विजयी (64616)
4) रत्नागिरी
उदय सामंत, शिवसेना- विजयी (93876)
सुरेंद्र माने, भाजप -पराभूत (54449)
5)गुहागर (रत्नागिरी)
भास्कर जाधव, राष्ट्रवादी - विजयी (72525)
विनय नातू, भाजप -पराभूत (39761)
6) कुडाळ (सिंधुदुर्ग)
नारायण राणे, काँग्रेस- पराभूत ( 60206)
वैभव नाईक, शिवसेना- विजयी (70582)
7) कणकवली (सिंधुदुर्ग)
नितेश राणे, काँग्रेस -विजयी (74715)
प्रमोद जठार, भाजप - पराभूत ( 48736)
8) सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
दीपक केसरकर, शिवसेना -विजयी (70902)
राजन तेली, भाजप - पराभूत ( 29710)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना 2 जागांवर तर कॉग्रेस 1 जागेवर आघाडी
कुडाळ मतदारसंघ- शिवसेना (वैभव नाईक ) आघाडीवर, तर काँग्रेस (नारायण राणे) पिछाडीवर
सावंतवाडी मतदारसंघ - शिवसेना आघाडीवर (दिपक केसरकर), तर भाजप पिछाडीवर
कणकवली मतदारसंघ- काँग्रेस आघाडीवर (नितेश राणे), तर भाजप (प्रमोद जठार) पिछाडीवररत्नागिरी जिल्हा- शिवसेना 4 जागांवर आघाडी तर राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडी
गुहागर मतदारसंघ - राष्ट्रवादी ( भास्कर जाधव ) आघाडीवर तर भा़जप (डॉ.विनय नातू) पिछाडीवर
राजापूर मतदारसंघ- शिवसेना (राजन साळवी ) आघाडीवर तर काँग्रेस (राजेंद्र देसाई) पिछाडीवर
रत्नागिरी मतदारसंघ- शिवसेना (उदय सामंत) आघाडीवर तर भाजप (सुरेंद्र उर्फ बाळ माने) पिछाडीवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.