मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोकणाच्या दर्‍यात हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी भटकंती

कोकणाच्या दर्‍यात हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी भटकंती

रत्नागिरी -14 मार्च : कोकणात दर्‍या डोंगरात वसलेल्या धनगर वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागलीये. रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या देवाच्या डोंगरावरील धनगर वाड्यांना उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने ग्रासलंय. एक हंडा पाण्यासाठी 2 ते 3 मैल डोंगर उताराची जीव मुठीत घेवून पायपीट करावी लागतेय. डोंगरावरील विहिरीचं पाणी आटल्याने डोंगरावर दाही दिशा भटकंती सुरू आहे.dapoli_water3 देवाच्या डोंगरावरील धनगर समाजाच्या वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दिवस रात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेली 15 वर्षं नळपाणी योजनेसाठी अनेक निवेदनं,आंदोलनं झाली. शासनाचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनं देवून वेळ मारून नेत आहेत. परंतु, दोन महिन्यात देवाच्या डोंगरावरील नळपाणी योजना मार्गी लागली नाही तर मुख्यमंत्री दालना समोर देवाचा डोंगर वासीय आत्मदहन करतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ झोरे यांनी दिलाय. देवाच्या डोंगरावरील धनगर समाजाच्या चार वाड्या, चार ग्राम पंचायती, चार तालुक्यात मोडतात. रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या जामगे देवाचा डोंगर, तुळशी देवाचा डोंगर, भोळ्वली देवाचा डोंगर, ताम्हाणे देवाचा डोंगर या चारही वाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. या ठिकाणी पाण्यावरून वाद होतात. विहिरी कोरड्या पडल्याने 4 महिने 5 ते 6 किलो मीटर ची पायपीट हंडा भर पाण्यासाठी करावी लागत आहे. शाळेत पाणीच नसल्याने देवाच्या डोंगरावरील शाळेतील मुलांना दप्तराच्या ओझ्या बरोबरच पाण्याने भरलेली कळशी घरातून घेवून यावे लागत आहे. दिवाळीनंतर ही परिस्थिती सुरू होते. शाळेत पाणी नसल्याने शासनाचे उपक्रम राबविता येत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Ratnagiri, कोकण, रत्नागिरी

पुढील बातम्या