मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

केडीएमसीमधून 27 गावं वगळून भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

केडीएमसीमधून 27 गावं वगळून भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

प्रदीप भणगेसह राजेंद्र हुंजे, डोंबिवली 08 सप्टेंबर : कल्याण-डोंबिवली महापालिकेत जून महिन्यात समाविष्ट केलेली 27 गावं पुन्हा वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ह्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार्‍या भाजपनं शिवसेनेवरच कुरघोडी केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट व्हायला 27 गावातल्या नागरिकांचा विरोध होता. तरीही शिवसेनेनं जोरदार आग्रह धरत या गावांना 1 जून रोजी महापालिकेत समाविष्ट करुन घेतलं. तिथंही शिवसेनेनं बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना शह देण्यासाठी भाजपनं या गावातल्या लोकांना घेऊन संघर्ष समिती बनवली आणि त्यांची कैफियत मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यावर काही दिवसांपूवच् न्यायालयानं या गावांबाबत सरकारची भूमिका काय याची विचारणा केली होती. 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवा अशी मागणी भाजपनं केली होती.

KDMC

वगळलेली 27 गावं ही महापालिकेत राहावीत असं अजूनही ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे वाटतंय.

ह्या 27 गावांना महापालिकेतून वगळून भाजपनं शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. सरकारनं मंजूर केलेलं ग्रोथ सेंटरही याच 27 गावांच्या मध्यवतच् भागात आहे. त्यामुळं आता 27 गावांच्या विकासासाठी दरवषच् येणारा 1 हजार कोटींचा निधी काही कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळणार नाही. 27 वगळण्याचा निर्णय जरी भाजपनं घेतला असला, तरी आता युतीच्या दृष्टीनं बेबनाव होण्याचं हे पहिलं पाऊल पडलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Kalyan, KDMC, Shiva sena, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, गावं वगळली, डोंबिवली

पुढील बातम्या