मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

केजरीवाल यांचा तिसरा डोळा !

केजरीवाल यांचा तिसरा डोळा !

kejriwal4कौस्तुभ फलटणकर, दिल्ली

02 फेब्रुवारी : अरविंद केजरीवाल यांनी पंजाबची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. सत्तारूढ अकाली दल-भाजपा युती विरोधात लोकांमध्ये असलेला असंतोष आपल्याच पथ्यावर पडेल असा केजरीवाल यांना ठाम विश्वास आहे. पण अकाली दलाचे सर्वेसर्वा आलेले बादल कुटुंबीय या निवडणुकीत साम दाम दंड भेद वापरून सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात अशी भीती केजरीवाल यांना  वाटते आहे, म्हणूनच आम आदमी पक्षांनी पंजाबात अनोखी शक्कल लढवली आहे.

केजरीवालांनी १४,५०० गुप्त कॅमेरे भाड्याने घेऊन कार्यकर्त्यांना दिले आहेत. मतदानाआधी अकाली दलाने लोकांना आमिष किंवा भीती दाखवली तर आपचे कार्यकर्ते त्याचे स्टिंग करतील. हे कॅमेरे हाताळण्यासाठी आपने १६,००० कार्यकर्त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिले आहे. पंजाबमध्ये शनिवारी म्हणजे ४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. साधारण मतदानाआधी राजकीय पक्ष मतदारांना प्रलोभित करतात असा आरोप होत असतो. आपने त्यावर हा उतारा शोधून काढला आहे. खास म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा आपने हा प्रयोग केला होता. आता हे करून आप ला पंजाब जिंकण्याचा मार्ग मोकळा होणार का हे ११ मार्च ला कळेलच.

छुपा कॅमेरा आपसाठी दुधारी अस्त्र   

केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाचे स्टिंग करायला सांगितले पण कार्यकर्ते स्वतः:च्याच नेत्यांचे स्टिंग करतात हा आरोप होतो आहे. आपचे पंजाबचे माजी प्रमुख सुच्च सिंग छोटेपुरा यांनी आरोप केला आहे की, आपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्या हातात पैसे दिले आणि त्याचे स्टिंग करून व्हायरल केलं. आता असल्या डोकंदुखीला केजरीवाल कसं सांभाळणार हेही बघणं इंट्रेस्टिंगचं असेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Arvind kejriwal, Panjab, अरविंद केजरीवाल, केजरीवाल