मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कॅम्पा कोला रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संपणार

कॅम्पा कोला रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संपणार

    campa cola new12  जून : मुंबईच्या कॅम्पा कोला इमारतीतल्या रहिवाशांना देण्यात आलेली मुदत आज संध्याकाळी संपतेय त्यामुळे हा अनधिकृत भाग पाडला जाणार हे आता जवळ जवळ निश्चित झालं आहे. मात्र काहीही झालं तरी आम्ही घरं रिकामी करणार नाहीत असा निर्धार कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी केला आहे. सनदशीर मार्गानं लढलेल्या लढाईत अपयश आल्यानंतर आता आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पाकोलावासीय रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

    या इमारती पाडण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र कुठल्याही कॉन्ट्रक्टरने पसंती दर्शवली नाहीए. आतापर्यंत दोन वेळा या निविदा काढण्यात आल्या. पण कुणीही कॉन्ट्रक्टर पुढे न आल्यामुळे तूर्तास कुणालाही हे कॉन्ट्रक्ट मिळालेलं नाही. बीएमसीनं मात्र या इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत आणि कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. कारवाई करण्यासाठी बीएमसीला पुन्हा एकदा या इमारतींच्या अनधिकृत मजल्यांची वीज आणि गॅसचा पुरवठा तोडावा लागणार आहे. त्यानंतर इमारतीमध्ये शिरून काही भिंती पाडल्या जातील. एवढी कारवाई करण्यासाठी बीएमसीला कुठल्याही कॉन्ट्रक्टरची गरज नाही. त्यानंतर जेव्हा कधी कॉन्ट्रक्टर नेमला जाईल तेव्हा हे बांधकाम पाडण्यात येईल.

    दरम्यान जीव गेला तरी बेहत्तर पण, आपण राहतं घर सोडणार नाही अशी ठाम भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे. बिल्डर आणि अधिकार्‍यांच्या चुकीची शिक्षा आम्हाला का, असा प्रश्नही ते विचारत आहेत. राज्य सरकारविरोधातही ते आपला रोष व्यक्त करत आहेत.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: Raj thakre, Sc, Supreme court decision