12 नोव्हेंबर : मुंबईतील वरळीतल्या कॅम्पाकोला इमारतीवर उद्या खर्या अर्थाने बुलडोझर चालणार आहे, आज अधिकारी अनधिकृत फ्लॅटचे फक्त मार्किंग करणार आहेत. कॅम्पाकोला परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सोसायटीचे अनधिकृत मजले पाडण्याची कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक, महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या कॅम्पा कोला परिसरात दाखल झाला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इथले अनधिकृत मजले पाडण्याच्या कारवाईला सकाळी 11च्या सुमारास सुरूवात झाली. ऐकीकडे पोलिस कॅम्पा कोलाच्या इमारतीत जाण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे रहिवासी मात्र त्यांना आत येण्यास् विरोध करत आहेत. रहिवाशांनी महापालिका पथकाला प्रवेश करण्यापासून मज्जाव करत गेटसमोर ठाण मांडल्याने कॅम्पा कोलात तणाव निर्माण झाला आहे.
रहिवाशांच्या प्रखर विरोधामुळे महापालिकेने आज कॅम्पा कोलावर कारवाई न करता सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महापालिकेचे पथक या घरांचे वीज, पाणी आणि गॅसचे कनेक्शन तोडून केवळ मार्किंग करणार आहे. कॅम्पा कोलातील बेकायदेशीर मजल्यांवरील कारवाई तुर्तास टळली आहे. मात्र उद्यापासून या घरांवर हातोडा पडणार असल्याचे सांगितले जाते.
कॅम्पाकोला' वर कारवाई
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Police, कॅम्पा कोला, वरळी