मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कॅबिनेटच्या बैठकीत सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे 'पारदर्शक' मागणी

कॅबिनेटच्या बैठकीत सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे 'पारदर्शक' मागणी

cabinate_meetin_sena03 फेब्रुवारी : पारदर्शकतेच्या मुद्दावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये महापालिका निवडणुकीत चांगलीच जुंपली होती. आज कॅबिनेटच्या बैठकीत सेना नेत्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थितीत करत कॅबिनेटच्या बैठकीला लोकायुक्त, पत्रकारांना सहभागी करा अशी मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सेनेची मंत्री रावते आणि एकनाथ शिंदे यांनी पारदर्शतेचा मुद्दा उपस्थित केला.

कॅबिनेटच्या बैठकीला लोकायुक्त, पत्रकारांना सहभागी करा,पत्रकार, लोकायुक्त आणि विरोधी पक्षनेत्यांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करा अशी मागणी शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सुचनेचा विचार करू असं आश्वासन दिलं. दरम्यान, घटनेच्या अधीन राहून सर्व राजकीय पक्ष, अगदी सर्वसामान्यांच्या पारदर्शकतेबद्दल सुचवलेल्या सर्व सुचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करू अस विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.

विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीदरम्यान पारदर्शी पणाच्या मुद्यावरुन सेना- भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती.

(संग्रहित छायाचित्र)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: बैठक