Home /News /news /

कुर्ला-अंबरनाथ ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले,वाहतूक हळूहळू पूर्ववत

कुर्ला-अंबरनाथ ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले,वाहतूक हळूहळू पूर्ववत

KALYAN TRAIN DERAILED 29 डिसेंबर - कल्याण - विठ्ठलवाडी दरम्यान कुर्ला -अंबरनाथ 5.48ची ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले.रुळाचा 150 मी. ट्रॅक उखडला गेला आणि हे 5 डब्बे घसरले. पण सुदैवानं कुणालाच दुखापत झाली नाही. यामुळे ट्रेनचा पेंटाग्राफ तुटला. मध्य रेल्वेनं युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू केलंय. ट्रॅक, सीग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर या पातळ्यांवर हे काम सुरू करून अप दिशेची मुंबईकडे येणारी पहिली ट्रेन 9.23ला रवाना झाली. दरम्यान डेक्कन एक्स्प्रेस, पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द केल्या. इंद्रायणी एक्स्प्रेस दिवा-पनवेल मार्गावरून वळवली. कल्याण-बदलापूर मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी केडीएमसीच्या 14 जादा बसेस सोडल्या गेल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Kalyan, Train, कल्याण

पुढील बातम्या