मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /काश्मीरमध्ये चकमकीत चौथ्या अतिरेक्याचाही खात्मा

काश्मीरमध्ये चकमकीत चौथ्या अतिरेक्याचाही खात्मा

    2015_3image_08_45_517998000jammukashmirattack-ll12 जुलै : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आता चौथ्या अतिरेक्याचाही खात्मा करण्यात आलाय. पुँछमध्ये गेल्या चोवीस तासापेक्षा जास्त काळापासून ही चकमक सुरू आहे. आतापर्यंत ह्या चकमकीत एक पोलीस जवान शहीद झालाय तर चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलंय.

    तर दुसर्‍या एका घटनेत रविवारी काश्मीरमध्ये एलओसीजवळ घुसखोरी करणार्‍या चार पाकिस्तानी घुसखोरांना मारण्यात आलंय. कुपवाड्यातल्या तंगधार आणि बांदीपुर्‍यातल्या गुरेजमध्ये जवानांनी ही कारवाई केलीय. पुँछमध्ये आज सकाळपासून सुरू झालेली चकमक कायम आहे आणि अतिरेकी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लपलेले आहेत.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


    First published:

    Tags: Pakistan, अतिरेकी, जम्मू काश्मीर, पाकिस्तान