मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

काय होणार महाग, काय होणार स्वस्त ?

काय होणार महाग, काय होणार स्वस्त ?

swasta mahang3नवी दिल्ली - 29 फेब्रुवारी : अच्छे दिनचं स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारने या बजेटमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिसा कापला आहे. इन्कम टॅक्समध्ये कोणताही वाढ न करता सर्व करांमध्ये 0.5 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये खरेदी असो अथवा हॉटेलमध्ये जेवण आता सर्वच खर्चावर 0.5 टक्के कर द्यावा लागणा आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे महागड्या गाड्या, बिडी वगळता तंबाखूजन्य पदार्थ, चामड्याच्या वस्तू महाग झाल्या आहे. त्याचबरोबर सोनं,हिरे, दागिने, ब्रँडेड कपडे महागले आहे. तर छोटे घरं खरेदी करतांना आयकरात सूट देण्यात आलीये. तसंच जिल्ह्यास्तरावर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे यंत्र लावण्यासाठी आयातकर माफ करण्यात आलाय. हे महागणार - गाड्या     - ब्रँडेड कपडे - लेदर उत्पादनं - सोनं,हिर्‍यांचे दागिने - तंबाखू, सिगारेट, गुटखा - हॉटेलिंग - विमा पॉलिसी - दगडी कोळसा - डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ट्राझांक्शन - सिलबंद पाण्याची बॉटल - मोबाईल बील - सिमेंट - लेदर बुट - चप्पल - केबल सेवा - विमान प्रवास - रेल्वे तिकीट - सिनेमा तिकीट हे होणार स्वस्त - छोट्या घरांसाठी सवलत - अपंगांसाठीचे साहित्य स्वस्त - एलईडी टीव्ही - इलेक्ट्रिक कार - ओव्हन - मोबाईल - टॅबलेट - औषधी - ऍम्बुलन्स सर्व्हिस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: BJP, Gold, Union budget, स्वस्त

पुढील बातम्या