14 मे : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका गेस्टहाऊसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 4 भारतीयांसह 9 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी 3- 4 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
काबूलमधल्या कोलोला पुश्त इथल्या पार्क पॅलेस हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री संगीताचा कार्यक्रम होणार होता. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 4 बंदुकधारी दहशतवाद्यांनी हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झालेत. पोलीस आणि विशेष सुरक्षा यंत्रणांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या 44 जणांची सुटका केली आहे.
दरम्यान, या हॉटेलमध्ये तीन भारतीय होते. ते तिघेही सध्या भारतीय दुतावासात सुरक्षित असल्याचे अफगाणिस्तानमधील भारताच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. या हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अफगाणिस्तान