Home /News /news /

काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीला तयार -सुशीलकुमार शिंदे

काँग्रेसही मध्यावधी निवडणुकीला तयार -सुशीलकुमार शिंदे

Sushil kumar shinde12314 फेब्रुवारी : राज्यात कधीही  मध्यावधी किंवा अल्पमध्यवधी निवडणुका लागल्या तर काँग्रेस पक्ष नेहमीच तयार असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय. ते उस्मानाबादमध्ये प्रचारसभेत बोलत होते. सरकारला अडीच वर्ष पूर्ण झालीयेत आहेत, आता मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी निवडणुकांसाठी तयार असल्याचं  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळलाय. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेला वाद ग्रामपंचायतमध्ये सुद्धा कधी पाहायला मिळाला नाही. हे सरकार म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचीच भात असल्याची टीका सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी केली. सुशीलकुमार यांनी केवळ सेना भाजपवर नाही तर राष्ट्रवादी हे बंद पडलेले घड्याळ असल्याची टीकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Congress, Sushilkumar shinde, काँग्रेस, मुंबई, सुशीलकुमार शिंदे

पुढील बातम्या