मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कल्याण : मंदिरातून चोरानं लांबवली 2 लाखांची रोकड, चोरी सीसीटीव्हित कैद

कल्याण : मंदिरातून चोरानं लांबवली 2 लाखांची रोकड, चोरी सीसीटीव्हित कैद

02 ऑगस्ट : भक्त देवदर्शनात मग्न असताना चोरट्यांनी त्यांची पैशांची बॅग लांबवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. देवळाच्या गाभार्‍यातूनच मोठ्या चपळाईने चोरट्यांनी 2 लाख रुपये पळवून नेले आहेत. सुदैवाने ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरी प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

kal;yan chori

आपल्या मालकानं दिलेली 2 लाख रूपयांची रोकड घेऊन महेश मिस्त्री कल्याण रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. वाटेत हनुमान मंदिर दिसल्याने मिस्त्री दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी आपल्या हातातील पैशांची बॅग त्यांनी मंदिराच्या गाभार्‍यातीलच एका खुर्चीवर ठेवली आणि ते दर्शनासाठी पुढे गेले. मात्र त्याचवेळी संधी साधत चोरांनी मोठ्या शिताफीने ही बॅग लांबवून नेली. मिस्त्री यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या एका चोरट्याने ही संधी साधली. त्याने ही बैग उचलून मंदिराबाहेर उभ्या असलेल्या आपल्या दोन साथीदारांसह मोटरसायकलवरून पळ काढला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Cctv, Kalyan, कल्याण, मंदिर

पुढील बातम्या