मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कर्जमाफीवरुन विरोधकांना शिवसेनेची साथ, भाजपा एकाकी

कर्जमाफीवरुन विरोधकांना शिवसेनेची साथ, भाजपा एकाकी

Vidhanbhabady

16 जुलै : कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक असतानाच आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही विरोधकांच्या सुरात सुर मिसळले आहे. प्रसंगी कर्ज घ्या, पण कर्जमाफी द्या अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीच्या मुद्द्यावरील चर्चेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन चांगलेच गाजते आहे. सलग चौथ्या दिवशी विरोधकांनी विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. तीन दिवस सभागृहाबाहेर गोंधळ घातल्यावर आज (गुरूवारी) विरोधक चर्चेसाठी सभागृहात हजर होते. विधान परिषदेत विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दुपारी एकपर्यंत तहकूब करावे लागले.

विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन रान उठवलं. आघाडीचं सरकार असताना शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी मागणारं भाजप आता काय करतंय असा सवाल विरोधकांनी केला. शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे, त्यांना वाचवण्याची गरज असल्याचं मत विरोधकांनी यावेळी मांडलं. विशेष म्हणजे शिवसेनेनेही विरोधकांच्या सूरात सुर मिसळत कर्जमाफीची मागणी केली. प्रसंगी कर्ज घ्या पण कर्जमाफी करा अशी मागणी शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राजन साळवी यांनी केली आहे. औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, विधानसभेमध्ये याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कामकाजात सहभागी झाले. यावरून गेले तीन दिवस एकत्रितपणे आंदोलन करणाऱया विरोधकांमध्ये फूट पडल्याचे चित्र दिसत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Cm devendra Fadanvis, Congress, Monsoon Season, कर्जमाफी, गुलाबराव पाटील, पावसाळी अधिवेशन, भाजप, शिवसेना