मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कन्हैया खरं बोलला, मोदींनी मराठवाड्यात यायलाच हवं -संजय राऊत

कन्हैया खरं बोलला, मोदींनी मराठवाड्यात यायलाच हवं -संजय राऊत

25 एप्रिल : आम्ही कन्हैया कुमारचं समर्थन करत नाही. पण, कन्हैया कुमारने मराठवाड्यातील दुष्काळाबाबत प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळावर बोललं पाहिजे. त्यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

जगभरात फिरणारे पंतप्रधान मोदी दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का आले नाही असा थेट सवाल जेएनयूचा अध्यक्ष कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला होता. त्याच्याच या मागणीची रिघ शिवसेनेनंही ओढली आहे. कन्हैयाच्या मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना कन्हैयाच्या सुटकेवर सवाल उपस्थित करत मोदी सरकावर टीका केलीये. कन्हैया आमचीच भाषा बोलतो आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे, मोदींनी मराठवाड्यात यायलाच हवं. कन्हैया कुमारने मराठवाड्यातील दुष्काळाबाबत प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर द्यावे लागेल. पंतप्रधानांनी दुष्काळावर बोललं पाहिजे. त्यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे. मोदींनी मराठवाड्यात येऊन पाहावं. आसाम,पश्चिम बंगालमध्ये मोठ-मोठ्या रॅली काढत आहे. जगभरात फिरत आहे मग मराठवाड्यातही मोदींनी आलंच पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केलीये.sanjay_raut_on_pm

तसंच आम्ही कन्हैयाचं समर्थन केलं नाही. कन्हैयाची निर्मिती कुणी केली ?, त्याला एका रात्रीत कुणी हिरो केलंय ?, याचा मागे काय षडयंत्र आहे ? कन्हैया सोबत हार्दिक पटेलवरही राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे. पण कन्हैया आठवड्याभरात सुटतो आणि हार्दिक पटेल चार-पाच महिने जेलमध्ये राहतोय हे कसं काय घडलं. या मागे काय कारस्थान आहे हे लोकांना कळलं पाहिजे असंही राऊत म्हणाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचं महाराष्ट्रावर लक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठवाड्यात येण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: JNU, Mumbai, PM narendra modi, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुंबई, शिवसेना, संजय राऊत

पुढील बातम्या