मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कन्हैया कुमारनं देशविरोधी विधानं केलीच नाहीत - शत्रुघ्न सिन्हा

कन्हैया कुमारनं देशविरोधी विधानं केलीच नाहीत - शत्रुघ्न सिन्हा

shatrughansinha759

17 फेब्रुवारी :  आपल्या पक्षविरोधी विधानांमुळे सतत चर्चेत असणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा जेएनयूतील छात्र संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याच्या अटकेवरून पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. 'आमच्या बिहारच्या कन्हैय्यानं देशाच्या वा घटनेच्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही,' असं ट्विट करून सिन्हा यांनी कन्हैयाची अटक चुकीची ठरवली आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैया कुमारला अटक झाल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत या संघटनेने सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत कन्हैय्या कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करून ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे. 'आमच्या बिहारचा असलेल्या कन्हैयाचं भाषण मी ऐकलं आहे. त्यानं देशाच्या किंवा राज्यघटनेच्या विरोधात काहीही म्हटलेलं नाही. त्याला लवकरच सोडलं जाईल अशी आशा आहे. तसं झालं तर चांगलं होईल,' असं त्यांनी म्हटलंय. 'राजकारण्यांनी निर्माण केलेल्या वादामुळं जेएनयू संकटात आहे. हे एक जागतिक दर्जाचं विद्यापीठ आहे. भारतातील युवाशक्तीला दिशा देणारं तसंच देशाला चांगले शिक्षक देणारी ही संस्था आहे. ही संस्था वादापासून दूर ठेवायला हवी,' असं त्यांनी ट्विटमध्ये पुढं म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, वकिल, शत्रुघ्न सिन्हा

पुढील बातम्या