मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कन्हैयाची जीभ छाटणार्‍याला 5 लाखांचं इनाम, भाजयुमोच्या नेत्याची मुक्ताफळं

कन्हैयाची जीभ छाटणार्‍याला 5 लाखांचं इनाम, भाजयुमोच्या नेत्याची मुक्ताफळं

460433-kanhaiya-kumar

नवी दिल्ली – 05 मार्च : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याची जीभ छाटणार्‍याला भाजप युवा मोर्चाच्या (भाजयुमो) पदाधिकार्‍याकडून पाच लाख रुपयांचा इनाम जाहीर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील बदायू इथल्या भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष कुलदीप वार्ष्णेय याने ही मुक्ताफळं उधळली आहेत.

कन्हैय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आमच्या संघटनेबद्दल अपशब्द काढले आहेत. भारताविरोधी घोषणा देण्यासाठी कन्हैय्यानंच इतर आंदोलकांना भाग पाडलं, असा आरोप करत कुलदीपने कन्हैय्याची जो जीभ कापेल त्याला 5 लाखांचं बक्षीस घोषित केलं आहे. दरम्यान, या वक्तव्यवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Abvp, JNU, Protest, अभाविप, वकिल