मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कन्हय्या देशद्रोही असल्याचा पुरावा नाही, गृहमंत्रालयाची माहिती

कन्हय्या देशद्रोही असल्याचा पुरावा नाही, गृहमंत्रालयाची माहिती

460433-kanhaiya-kumar

नवी दिल्ली – 17 फेब्रुवारी : जेएनयू विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याने देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने 'पीटीआय'ला दिली आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं त्याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या निमित्ताने जेएनयूमध्ये आयोजित कार्यक्रमात कन्हैय्या उपस्थित होता. मात्र, त्याने भारतविरोधी घोषणा दिल्या नाही. तसेच कोणतेही देशद्रोही कृत्य केले नाही. तसा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कन्हैय्या कुमारवर देशद्रोहासारखा गंभीर आरोप करणे म्हणजे दिल्ली पोलिसांमधील काही अधिकार्‍यांनी अति उत्साह दाखविण्यासारखे असल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने कन्हैया कुमारला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, जेएनयू प्रकरणी चौकशी सुरू असून, कन्हैया कुमार बाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आली नसल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, Delhi police, Deshdrohi, JNU, Kanhaiya Kumar, Protest, PTI, Rajnath singh, SAR Geelani, अभाविप, गृहमंत्रालय, जेएनयू, देशद्रोह, पटियाला कोर्ट, प्रा. एस ए आर गिलानी, वकिल

पुढील बातम्या