मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'एफडीआय'च्या नावानं चांगभलं, अन्न प्रक्रियेत 100 टक्के एंट्री

'एफडीआय'च्या नावानं चांगभलं, अन्न प्रक्रियेत 100 टक्के एंट्री

food_procesing 29 फेब्रुवारी : एफडीआय भारतीयांसाठी 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. आणि आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचा शब्द खरा ठरवत एफडीआयला अन्न प्रक्रिया क्षेत्रात 100 टक्के परवानगी दिली आहे. त्यामुळे आता परदेशी कंपन्यांना मार्केट आता अधिक मोकळे झाले. यूपीए सरकारच्या काळात एनडीएने एफडीआयला कडाडून विरोध केला होता. पण, आता सत्तेवर विराजमान झाल्यानंतर मागील वर्षीप्रमाणे यंदाही बजेटमध्ये एफडीआयला आणखी दार मोकळे करून दिले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. अन्न उत्पादन क्षेत्रात एफडीआयला 100 टक्के परवानगी देण्यात आलीये. विशेष म्हणजे मोदी सरकारने 'मेक इन इंडिया'चा नारा देत परदेशी गुंतवणुकीसाठी दार मोकळे केले आहे. आज बजेटमधून पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांनी एफडीआयच्या नावानं चांगभलं म्हणत थेट 100 टक्के परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत आधीच असलेल्या परदेशी कंपन्यांचे आता अस्सल भारतीय अन्नाचे फूड पॅकेट पाहण्यास मिळाले तर आश्चर्य वाटू नये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: #अर्थबजेट2016 बजेट, Arun Jaitley, BJP, FDI, Union budget, एफडीआय, बजेट2016

पुढील बातम्या