Home /News /news /

एक्झिट पोल : पुण्यात 'कमळ' उमलणार, काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर ?

एक्झिट पोल : पुण्यात 'कमळ' उमलणार, काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर ?

pune_exit_poll_new21 फेब्रुवारी : राज्यात १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालंय.  त्यामुळे आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 23 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल आहे.  त्याआधी अॅक्सिस - इंडिया टुडे यांच्या एक्झिट पोलमध्ये काही अंदाज व्यक्त करण्यात आलेत. यानुसार पुण्यात  भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, असा या पोलचा अंदाज आहे.

पुण्यामध्ये एकूण 162 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 77 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपखालोखाल काँग्रेस-राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहील. काँग्रेस-राष्ट्रवादीला 60 ते 66 जागा मिळतील असा अंदाज यात वर्तवण्यात आला. तर शिवसेनेला इथे मोजक्याच जागा मिळतील, अशी शक्यता आहे. तर मनसेला फक्त 3 ते 6 जागा मिळणार आहे. अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल - भाजप - 77 ते 85 - काँग्रेस-राष्ट्रवादी - 60 ते 66 - शिवसेना - 10 ते 13 - मनसे - 3 ते 6 - इतर - 1 ते 3 पुणे- सध्याचे पक्षीय बलाबल  भाजप 26  राष्ट्रवादी काँग्रेस 51 काँग्रेस 28  शिवसेना 15  मनसे 29
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Pune, Pune election, पुणे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या