Home /News /news /

एअर इंडिया विमानाच्या जेवणात सापडली पाल

एअर इंडिया विमानाच्या जेवणात सापडली पाल

air india flt13 जून : दिल्लीहून लंडनला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानातील जेवणात पाल सापडल्यामुळे एकच खळबळ उडालीये. गुरुवारी दुपारी एक वाजता एअर इंडियाचं विमान रवानं झालं होतं त्यात ही घटना घडलीये. विमानाने लंडनसाठी टेक ऑफ केल्यानंतर सर्व प्रवाशांना जेवण देण्यात आलं. पण, एका प्रवाशाच्या जेवणात पाल आढळून आली. विमानातील उपस्थित कर्मचार्‍यांनी लगेच जेवण बदलून देण्याची तयारी दर्शवली पण प्रवाशाने जेवण बदलून घेण्यास नकार दिला. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रवाशाने या प्रकरणी एअर इंडियाकडे तक्रार नोंदवलीये. आता एअर इंडियाने काय कारवाई करत हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Air india, Delhi

पुढील बातम्या