Home /News /news /

एअर इंडियाच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली

एअर इंडियाच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली

air_india3मुंबई -01 जुलै : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली. एअर इंडियाचं विमान ऐरोब्रिजला आदळलं. सुदैवाने या दुर्घटनेत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. मुंबई विमानतळावर मुंबईहुन रियादला जाणार विमान अचानक ऐरोब्रिजला आदळल्यामुळे खळबळ उडाली. विमान धडकल्याचं लक्षात येताच सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलंय. वैमानिकाने तातडीने विमान थांबवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. नेमका हा अपघात का झाला याबद्दल तपास सुरू आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Air india

पुढील बातम्या