19 सप्टेंबर : उरी हल्ल्यात आणखी एका महाराष्ट्राचा सुपुत्राला आपला जीव गमवावा लागला. यवतमाळचे के विकास जनार्दन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील 4 जवान शहीद झाले आहे.
शहिदांचा आकडा 18 वर गेलाय त्यात 4 जवान हे महाराष्ट्रातले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेेश्वरचे विकास जानराव उईके, सातार्यातले चंद्रकांत शंकर गलांडे आणि नाशिकच्या खडंगळीचे संदीप सोमनाथ ठोक यांचा समावेश आहे. हे तिघेही 6 बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. या हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळचे के विकास जनार्दन यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
वणी तालुक्यातील पुरड(नेरड)येथील विकास जनार्धन कुळमेथे 31 हा जवान शहीद झाला आहे. त्याचे पार्थिव सोमवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास पुरड येथे आणणार आहे. विकास यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Srinagar, Terrorist attack, Uri attack, काश्मीर, के विकास जनार्दन, यवतमाळ