Home /News /news /

उद्योगांच्या विकासासाठी राजकारण नको -पवार

उद्योगांच्या विकासासाठी राजकारण नको -पवार

pawar in maccai09 ऑगस्ट : राज्यात कोणताही उद्योग उभा करायचा असेल तर त्याच्या विरोधात ऍक्शन कमिटी स्थापन होते. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीकरता पोषक वातावरण तयार होण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातील माध्यमं आणि जानकारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असं मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं.

तसंच गुजरातमध्ये एखादा प्रकल्प येत असेल तर राजकीय पक्ष आडकाठी आणत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडेही उद्योग उभारणीमागे राजकारण होता कामा नये त्यानूसार आपणंही पाऊल टाकलं पाहिजे असा सल्लाही शरद पवारांनी दिला.

महाराष्ट्र चेंम्बर ऑफ कॉमर्स तसंच इंडस्ट्री ऍन्ड ऍग्रीकल्चर आणि आयबीएन लोकमत यांच्या वतीनं आज संयुक्तपणे उद्योगविश्वात भरीव कामगिरी करणार्‍या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमधल्या विकासाच्या वातावरणाचं कौतुक केलं.

First published:

Tags: Sharad pawar, विकास, शरद पवार

पुढील बातम्या