22 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत मनसेचा झालेल्या दारूण पराभवानंतर पक्षांतर्गत वाद आणि नेत्यांची घुसमट आता बाहेर येऊ लागली आहे. मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय. पण दरेकर यांनी बाळा नांदगावकर यांच्यामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पक्षांतर्गत वादालासुद्धा आता तोंड फुटलंय.
प्रवीण दरेकर यांनी आपल्या सरचिटणीसपदाच्या राजीनाम्याचा फॅक्स मनसेच्या मुख्य ऑफिसवर पाठवलाय, तसंच 'कृष्णकुंज'वर एक प्रत ठेवल्याचंही दरेकरांनी सांगितलंय.. बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्यामुळे आपण सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असं दरेकर यांनी सांगितलंय. पक्षाचं धोरण,भूमिका बरोबर आहे पण आमचे आमदार विकासकाम करत नाही असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे दरेकर दुखावले गेले. मी काही गेंड्याच्या कातडीचा कार्यकर्ता नाही. आजपर्यंत संवेदनशीलपणे पक्षासाठी काम केलं. पण आमचेच गटनेतेच जर असे आरोप करत असतील तर सरचिटणीसपदावर राहण्याचं मला योग्य वाटलं नाही म्हणून राजीनामा दिला. तसंच मी कोणत्याही पक्षात जाणार नाही कुणाशीही तशी चर्चा नाही असंही दरेकर यांनी स्पष्ट केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Pravin darekar