मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आ.विनायक निम्हणांच्या समर्थकांचा पालिकेच्या शाळेत धुडगूस

अद्वैत मेहता, पुणे 06 मार्चपुणे : एकीकडे राज्यात शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा फटका महापालिकेच्या शाळांना बसतोय. पुण्यातील शिवाजीनगरमधल्या मनपा शाळेचा कार्यक्रम स्थानिक आमदार विनायक निम्हण यांच्या समर्थकांनी उधळून लावला आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत नाव न टाकल्यानं निम्हण समर्थकांनी धुडगूस घातला. शिवाजीनगरमधल्या नरवीर तानाजीवाडी इथल्या शाळेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या आमदार निधीतून नवी इमारत बांधली जातेय. उन्हाळ्यात मुलांना त्रास होऊ नये यासाठी या इमारतीतील तयार झालेल्या 3 ते 4 खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतर करण्याचा कार्यक्रम 5 मार्चला ठेवण्यात आला होता. पण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेसचे स्थानिक आमदार विनायक निम्हण यांचं नाव टाकण्यात आलं नव्हतं. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या निम्हण समर्थकांनी तोडफोड करत कार्यक्रम उधऴून लावला. या गोंधळामुळे गरीब विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच धास्तावले.. तर आमदार अनिल भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली. आमदार विनायक निम्हण यांच्या समर्थकांनी मात्र आपल्यावरचा आरोप फेटाळून लावला. शिक्षण मंडळाचे कारभारी राजकारण करत असून स्थानिक आमदारांना जाणीवपूर्वक डावलल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला.विद्येचं माहेरघर असं बिरुद मिरवणार्‍या पुण्यात महापालिका शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ प्रतिष्ठेसाठी आरोप-प्रत्योराप सुरु झालेत. पण याचा मनस्ताप मात्र गरीब विद्यार्थी आणि पालकांना सोसावा लागतोय.

पुढे वाचा ...

अद्वैत मेहता, पुणे

06 मार्च

पुणे : एकीकडे राज्यात शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा फटका महापालिकेच्या शाळांना बसतोय. पुण्यातील शिवाजीनगरमधल्या मनपा शाळेचा कार्यक्रम स्थानिक आमदार विनायक निम्हण यांच्या समर्थकांनी उधळून लावला आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत नाव न टाकल्यानं निम्हण समर्थकांनी धुडगूस घातला.

शिवाजीनगरमधल्या नरवीर तानाजीवाडी इथल्या शाळेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या आमदार निधीतून नवी इमारत बांधली जातेय. उन्हाळ्यात मुलांना त्रास होऊ नये यासाठी या इमारतीतील तयार झालेल्या 3 ते 4 खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना स्थलांतर करण्याचा कार्यक्रम 5 मार्चला ठेवण्यात आला होता. पण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेसचे स्थानिक आमदार विनायक निम्हण यांचं नाव टाकण्यात आलं नव्हतं. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या निम्हण समर्थकांनी तोडफोड करत कार्यक्रम उधऴून लावला. या गोंधळामुळे गरीब विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच धास्तावले.. तर आमदार अनिल भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली.

आमदार विनायक निम्हण यांच्या समर्थकांनी मात्र आपल्यावरचा आरोप फेटाळून लावला. शिक्षण मंडळाचे कारभारी राजकारण करत असून स्थानिक आमदारांना जाणीवपूर्वक डावलल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला.

विद्येचं माहेरघर असं बिरुद मिरवणार्‍या पुण्यात महापालिका शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ प्रतिष्ठेसाठी आरोप-प्रत्योराप सुरु झालेत. पण याचा मनस्ताप मात्र गरीब विद्यार्थी आणि पालकांना सोसावा लागतोय.

First published: