23 एप्रिल : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. औरंगाबादेत पुन्हा एकदा भगवा फडकणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. युतीने 52 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं सर्वाधिक 29 जागा पटकावल्या आहे तर भाजपने 23 जागा जिंकल्यात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खालसा झाला असून एमआयएम पक्षाने जोरदार मुसंडी मारत 25 जागा जिंकून आपली दखल घेण्यास भाग पाडलंय. एमआयएमने काँग्रेसला आसमंत दाखवले आहे.पण दोन्ही ठिकाणी युती आणि राष्ट्रवादीला बहुमताने हुलकावणी दिलीये.
औरंगाबादच्या आखाड्यात काही चांगले आणि धक्कादायक निकाल हाती आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ह्रषिकेश खैरे समर्थनगरमधून विजयी झाले आहे. त्यांनी माजी उपमहापौर किशोर थोरात यांचा पराभव केलाय. तर दुसरीकडे खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे पराभूत झाले आहे. खैरेंचा बालेकिल्ला समजला जाणार्या गुलमंडीतून सचिन खैरेंना पराभवाला सामोरं जावं लागलंय. भाजपचे बंडखोर उमेदवार राजू तनवाणी यांनी सचिन खैरे यांचा पराभव केलाय. विशेष, म्हणजे एमआयएमने 25 जागा मिळवून काँग्रेसचा सुपडा साफ केलाय.
तर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचं वर्चस्वपणाला लागलंय. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर राष्ट्रवादीने जोरदार आघाडी घेतली. मात्र, भाजप आणि शिवसेनेनं जोरदार लढत देत चुरस निर्माण केलीये. राष्ट्रवादी आणि युतीत रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीने ५२ जागा जिंकल्या आहेत. तर युतीने 44 जागांवर मुसंडी मारलीये. काँग्रेस 10,भाजप 6 तर अपक्ष 5 जागांवर समाधान मानावे लागले.
नवी मुंबईतही काही धक्कादायक निकाल पाहण्यास मिळाले. नवी मुंबईत शिवसेनेचे विजय चौगुले विजयी झाले आहे. तर सेनेच्या विठ्ठल मोरेंचा काँग्रेसच्या उमेदवारानं पराभव केलाय. गेल्यावेळी भाजपच्या एकमेव नगरसेविका विजया घरत केवळ सहा मतांनी हरल्या होत्या. तर दुसरीकेड वॉर्ड क्रमांक 109 नेरूळमधून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अशोक गावडे फक्त 3 मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अब्दुल्ला बागवान यांचा फक्त 3 मतांनी पराभव केलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, MIM, Shiv sena, औरंगाबाद महापालिका, गणेश नाईक, भाजप