मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'आम आदमी' पुन्हा मुख्यमंत्री !

'आम आदमी' पुन्हा मुख्यमंत्री !

cm arvind kejriwal14 फेब्रुवारी :'मैं, अरविंद केजरीवाल शपथ लेता हूँ की...' हा आवाज पुन्हा घुमला रामलीला मैदानावर...आम आदमी पार्टीच्या विजयाचे शिल्पकार अरविंद केजरीवाल यांनी लाखो दिल्लीकरांच्या साक्षीनं आज (शनिवारी) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल आणि त्यांच्या सहकर्‍यांना मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ दिली. अरविंद केजरीवाल यांनी पहिले शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे सहकारी मनिष सिसोदिया, असीम खान,संदीप कुमार, सत्येंद्र जैन, जितेंद्र तोमर आणि गोपाल राय यांनी शपथ घेतली. केजरीवाल यांच्या रुपाने दिल्लीकरांना पुन्हा एकदा 'आम आदमी' मुख्यमंत्री लाभलाय.

नवी दिल्लीतील रामलीला मैदान वर्षभरानंतर पुन्हा एकदा 'आप'मय झालं. मागील वर्षी 14 फेब्रुवारी 2014 रोजी आम आदमी पार्टीचे नेते अऱविंद केजरीवाल यांनी सरकार बरखास्त करण्याची घोषणा केली. आणि आज याच दिवशी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत 'दिल्लीचे तख्त' एकहाती राखल्यानंतर आम आदमी सरकाराचा शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर कोणताही गाजावाजा न करत सुरळीत वेळेवर पार पडला.

सकाळापासून रामलीला मैदान आपच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेलं होतं. आज व्हेलंटाईन्स डे असल्यामुळे 'केजरीवाल इंडिया लव्ह यू' अशी बॅनरही कार्यकर्त्यांनी झळकावले. केजरीवाल सकाळी 11 वाजता आपल्या कौशंबी येथील घरातून रामलीलाकडे निघाले. रामलीलाकडे रवाना होण्याअगोदर केजरीवाल यांच्या आईंनी औक्षण घातलं. 15 मिनिटांत केजरीवाल आपल्या इनोव्हा गाडीने रामलीलावर पोहचले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचं छोटेखानी मंत्रिमंडळही पोहचलं. केजरीवाल मैदानावर पोहचताच केजरीवाल यांच्या घोषणांनी मैदान दणाणून गेलं.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आपच्या मंत्रिमंडळाला शपथ दिली. सर्वात पहिले अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर त्यांचे विश्वासू सहकारी मनिष सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ असीम खान,संदीप कुमार, सत्येंद्र जैन, जितेंद्र तोमर आणि गोपाल राय यांनी शपथ घेतली. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सलग दुसरे आणि पदभार म्हणून आठवे मुख्यमंत्री ठरले आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी दिल्लीकरांचे धन्यवाद मानले. तसंच दिल्लीला पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त करणार, दिल्ली देशातलं पहिलं भ्रष्टाचारमुक्त शहर असेलं असं आश्वासनही केजरीवाल यांनी दिलं. तसंच कार्यकर्त्यांना अंहकार बाळगू नका अशा कानपिचक्याही दिल्यात.

केजरीवाल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे – माझे कार्यकर्ते हिरे आहे -केजरीवाल – भारतीय टीम यावेळीही वर्ल्डकप जिंकून येईल, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो -केजरीवाल – पक्षासाठी अनेकांनी नोकर्‍या सोडल्यात, पडद्याआड असलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत हे आजच यश आहे – केजरीवाल – किरण बेदींचा मी खूप सन्मान करतो -केजरीवाल – किरण बेदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत -केजरीवाल – किरण बेदी , अजय माकन यांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेणार आहोत -केजरीवाल – आम्हांला ही पार्टी ती पार्टी असं न करता दिल्लीला एक आगळंवेगळं शहर बनावायचंय -केजरीवाल – सरकारी गाडी घेणार, कार्यालय घेणार जर घेतलं नाही तर कामं कसं करणार ? – केजरीवाल – एखादा मंत्री रस्त्यावरून जात असताना वाहतूक बंद केली जाते हे अयोग्य आहे -केजरीवाल – दिल्लीत व्हिआयपी संस्कृती बंद करणार -केजरीवाल – दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार -केजरीवाल – पंतप्रधान तुम्ही देश चालवा, मी दिल्ली चालवतो -केजरीवाल – दिल्लीत लवकरच जनलोकपाल विधेयक मंजूर करणार -केजरीवाल – आम्हाला सुरक्षित दिल्ली पाहिजेय -केजरीवाल – व्यापार्‍यांनो तुम्ही बिनधास्त व्यापार करा, पण सर्व टॅक्स भरा -केजरीवाल – मला ताप आहे तरी औषध घेऊन इथं आलो -केजरीवाल – मी आणि माझे सहकारी 24 तास काम करणार -केजरीवाल – दिल्लीला भारतातील पहिलं भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचंय -केजरीवाल – आप पक्षाची टोपी घालून गुंडगिरी किंवा काही चुकीचं काम करत असेल तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या-केजरीवाल – काँग्रेस आणि भाजपचा अंहकारामुळे पराभव झाला – केजरीवाल – मी अंहकार बाळगणार नाही, पाच वर्ष दिल्लीकरांची सेवा करणार -केजरीवाल – मनात अंहकार बाळगू नका – केजरीवाल – जर आपण मनात अंहकार बाळगला तर आपण आपल्या मिशनपासून दूर जाऊ शकतो – केजरीवाल – आम्ही इथून लढणार, तिथून लढणार हे योग्य नाही – केजरीवाल – सर्व धर्मीय, श्रीमंत, गरीब आणि सर्वसामान्य जनतेनं ‘आप’ला मतदान केलं -केजरीवाल ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: AAP, AAPkaCM, Kejriwal, Kejriwal oath ceremony, Kejriwal sworn in ceremony, अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी, शपथ

पुढील बातम्या