22 जानेवारी : रेल भवन परिसरात दोन दिवस आंदोलन करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे मात्र या एफआयआरमध्ये केजरीवाल यांचं नाव नाही.
दिल्ली पोलिसांनी संसदीय मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पक्षाविरोधात कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये कलम 144चा भंग, हिंसा आणि जमावाला भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव या एफआयआरमध्ये जरी नसलं तरी वेळ पडल्यास नायब राज्यपालांची परवानगी घेऊ न त्यांना अटक करू असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
दिल्ली पोलीस अधिकार्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सोमवारपासून धरणे आंदोलन करणारे केजरीवाल यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेतले. पाच पोलीस अधिकार्यांपैकी दोन पोलीस अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.