Home /News /news /

आधीच बंद केलेल्या टोलचा यादीत समावेश -मलिक

आधीच बंद केलेल्या टोलचा यादीत समावेश -मलिक

navab_malik01 जून : राज्यात सरकारनं टोलमुक्ती तर केलीये. या टोलमुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारवर आरोपस्त्र सोडले आहे. आघाडी सरकारने आधीच बंद असलेल्या टोलनाक्याची अंशत: टोलमुक्ती दिलेल्या टोलनाक्यांच्या यादीत समावेश केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

मनमाड तालुक्यातल्या पानवडी टोलनाका आधीच आघाडी सरकारने बंद केला होता. मात्र, पानवडी टोल नाक्याचा अंशत: टोलमुक्ती असलेल्या 53 टोल नाक्यांच्या यादीत नव्याने समावेश करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. हा टोल बंद असताना सेनेचे स्थानिक शिवसैनिक बेकायदेशीरपणे टोल गोळा करत होते. आता इथे जड वाहनांकडून टोल वसुलीची मुभा शिवसैनिकांना देण्यात आलीय, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, टोलमुक्त महाराष्ट्र, नवाब मलिक, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या