04 मार्च : 'आदर्श' घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या यादीतून आपले नाव वगळण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका आज (बुधवार) मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नुकतेच प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले अशोक चव्हाण या प्रकरणात आरोपीच राहणार आहेत. कार्टाच्या या निर्णयामुळे चव्हाण यांना झटका बसला आहे.
चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी देण्यास तत्कालिन राज्यपालांनी नकार दिल्यानंतर सीबीआयने चव्हाण यांचे नाव वगळण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती कोर्टाने नोव्हेंबरमध्ये फेटाळली होती. मात्र, या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा या मागणीसाठी खुद्द चव्हाणांनीच कार्टात धाव घेतली होती. ती याचिका आज (बुधवारी) हायकोर्टाने फेटाळली. चव्हाण यांनी निर्णय रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेला सीबीआयतर्फेही पाठिंबा दर्शवण्यात आल्यावर कार्टाने स्वत:च्याच निर्णयाला स्थगिती दिली होती. तसेच घोटाळ्यातून चव्हाण यांचे नाव वगळायचे की नाही याबाबत नव्याने सुनावणी घेतली. त्यावर कोर्टाने आपला पूर्वीचाच निर्णय बुधवारी कायम ठेवला आहे.
मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लाटल्याचं उघड झाले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला असून त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, CBI, अशोक चव्हाण