Home /News /news /

...आणि मुख्यमंत्र्यांविनाच नागपूर मेट्रोचं भूमिपूजन

...आणि मुख्यमंत्र्यांविनाच नागपूर मेट्रोचं भूमिपूजन

narendra modi in nagpur news21 ऑगस्ट : नागपूरच्या मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बहिष्कारांमुळे चांगलाच गाजला. अखेरीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याउपस्थितीविनाच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं.

नागपूरची संत्रानगरी म्हणून ओळख आहे, आता लवकरच नागपूरची मेट्रोसिटी अशी ओळख निर्माण होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. जग झपाट्यानं बदलतंय पण भारत मागे राहिला याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली, तसंच सर्वांनी मिळून एकत्रपणे देशाचा विकास करू असं आवाहन त्यांनी केलं.

तसंच मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भर दिला. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे त्याला हद्दपार करण्याची गरज आहे पण भ्रष्टाचाराला राजकारणीच कारणीभूत नाही तर सर्वच जण आहे. त्यामुळे याचा फटका मध्यमवर्गीयांना बसलाय आहे असंही मोदी म्हणाले. शहरीकरण हे संकट नाही तर शहरीकरण ही संधी आहे.

देशात 100 नव्या स्मार्ट शहरांची गरज आहे असंही मोदी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजर राहिली नाही त्यावर मात्र नरेंद्र मोदी यांनी भाष्य करण्याचं टाळलं. विशेष म्हणजे नागपूर मेट्रोला राज्य सरकारने अधिवेशानात परवानगी दिली होती. त्यानंतर भूमिपूजनाच्या आदल्यादिवशी केंद्राने परवानगी दिली आणि आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

'मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होते' राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला यायला पाहिजे होतं. त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. ते आलं असते तर चांगलं झालं असतं असा टोला नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी लगावला. तसंच आपण सगळ्यांनी टीम इंडिया म्हणून काम केलं पाहिजे असं पंतप्रधानांचं मत आहे. सर्वांनी मिळून काम करावं, ही काळाची गरज आहे अशी खंतही व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केली. बहिष्कार आणि निदर्शनं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पंतप्रधानांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. राज्य सरकाराचे प्रतिनिधी म्हणून नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. पण त्यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. मोदी नागपुरात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी नियोजनाप्रमाणे नागपूरजवळ मौदा इथं एनटीपीसीच्या पॉवर ग्रीडचं त्यांनी लोकार्पण केलं. दरम्यान, नागपूरमध्ये काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शनं केली. नागपूर मेट्रोच्या श्रेयाच्या मुद्द्यावरून ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात निदर्शनं केली आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतलं. तसंच नागपुरातल्या अजनीही चौकातही निदर्शनं करण्यात आली. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Modi in nagpur, Narendra modi, नरेंद्र मोदी, नागपूर, नागपूर मेट्रो, नागपूर मेट्रोचं भूमिपूजन, पंतप्रधान, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र, मुख्यमंत्री

पुढील बातम्या