22 जून : मुंबई महानगर परिसरात 24 तासांच्या आत आणखी एक इमारत कोसळली आहे. दहिसरमध्ये ही चार मजली इमारत कोसळली. शुक्रवारी मुंब्रा इथं इमारत कोसळली होती.
त्यात एकाच घरातल्या आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज दहिसर पूर्वेला स्टेशनजवळच्या परिसरात पियुष ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जण ठार झालेत तर 13 जण जखमी झाले आहे. धोकादायक अवस्थेत असल्यामुळे ही इमारत एक वर्षांपासून रिकामी करण्यात आली होती.
या इमारतीत अनधिकृतपणे राहत असलेल्या वॉचमनचा आणि कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश आहे. काहीजण ढिगार्याखाली अडकले असण्याचीही शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane, Thane building collapse, दहिसर, मुंब्रा