22 जानेवारी : आंध्र प्रदेशातील कुनेरू रेल्वे स्थानकाजवळ जगदलपूर-भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरून घसरल्यानं झालेल्या भीषण अपघातात 39 प्रवासी ठार झाले आहेत, तर 60हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं स्थानिकांच्या मदतीनं मदतकार्य सुरू केलं आहे.
Latest visuals from the Hirakhand express derailment site in Kuneru (Vizianagaram, Andhra Pradesh), 23 dead and 36 people injured. pic.twitter.com/ydTixYcMWz
— ANI (@ANI_news) January 22, 2017
आंध्रच्या विजयनगरम जिल्ह्यातील कुनेरू स्टेशनजवळ शनिवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाडी भुवनेश्वरला निघाली होती. रात्री 11च्या सुमारास कुनेरू स्थानकाजवळ असताना या गाडीच्या इंजिनासह एक माल डबा, दोन जनरल डबे, दोन स्लीपर कोच, एक एसी थ्री कोच आणि दुसऱ्या वर्गाचा एक डबा रुळावरून घसरले. त्यात 32 प्रवासी जागीच ठार झाले.
#WATCH Visuals from the Hirakhand express derailment site in Kuneru (Vizianagaram, Andhra Pradesh), 23 dead and 36 people injured. pic.twitter.com/7MQrTREsCy — ANI (@ANI_news) January 22, 2017
सर्व प्रवासी झोपेत असल्यानं नेमकं काय घडतंय, हे समजण्याच्या आतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी झाले असून अनेक लोक डब्याखाली अडकले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. जखमींची संख्या मोठी असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, रात्रीच्या अंधारात बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र दिवस होताच बचावकार्याने वेग धरला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विविध ठिकाणांवरून 4 रिलीफ व्हॅन पाठवण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं टि्वट करून सांगितलं. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदतीची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
मोदींच्या राज्यात ८ मोठे रेल्वे अपघात - एकूण ३३९ लोकांचा मृत्यू
- २० नोव्हेंबर २०१६ मध्ये उत्तर प्रदेशमधील कानपूरजवळ रेल्वे अपघात १५० लोकांचा मृत्यू, तर २०० जण जखमी
- २५ जुलै २०१६ साली मडुआडीह-इलाहाबाद पॅसेंजर ट्रेनला मिनी स्कूल बसची धडक, ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू...
- २० मार्च २०१५मध्ये डेहराडूनवरून वाराणसीला जाणारी जनता एक्स्प्रेस रुळावरून घसरली. २५ जणांचा मृत्यू तर ३०० पेक्षा जास्त जण जखमी
५ ऑगस्ट २०१५ साली मध्य प्रदेशात रेल्वे अपघात
मुंबई-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस आणि पटना- मुंबई जनता एक्स्प्रेस रुळावरून घसरली, ३१ जणांचा मृत्यू
- मे २०१४ मध्ये रायगड जिल्ह्यात पॅसेंजर रेल्वेचं इंजिन आणि ६ डबे रुळावरून घसरले
२० जणांचा मृत्यू, १२४ जण जखमी
- २६ मे २०१४ मध्ये उत्तर प्रदेशात गोरखधाम एक्स्प्रेसची मालगाडीला टक्कर, २२ जणांचा मृत्यू
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: आंध्र प्रदेश