21 एप्रिल : मुंबईचा विकास आराखडा रद्द झाला ही चांगली गोष्ट आहे. पण, जनतेची दिशाभूल करणारा असा आराखडा परत कुणी करू नये यासाठी या आराखड्यात असलेल्या तज्ञ आणि अधिकार्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये.
मुंबईचा विकास आराखडा राज्य सरकारने आज रद्द केलाय. नवा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई पालिकेला देण्यात आले आहे. आराखड्याला विरोध करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय. आराखडा रद्द केला याबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलंय. तसंच आराखडा रद्द होण्याचं श्रेय मराठी जनतेला दिलंय. जनतेच्या रेट्यामुळे हा आराखडा रद्द झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तसंच त्यांनी आराखडा तयार करणार्या अधिकार्यांना चांगलंच धारेवर धरलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हा आराखडा बनला होता. तोच आराखडा याही सरकारने पुढे रेटला. या आराखड्यावर पालिकेनं तब्बल 8 कोटी रुपये खर्च केले. आता ते पाण्यात गेले आहे. त्यामुळे जे कुणी या विकास आराखड्यात सामिल होते. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पुढे चालून कुणाची अशी हिंमत झाली नाही पाहिजे. कुणी कुंटे असतील खुंटे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, राज ठाकरे, राज्य सरकार, विकास आराखडा