19 नोव्हेंबर : 'आदर्श' घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या यादीतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना याप्रकरणी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणात अशोक चव्हाण आरोपी राहणार, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
'आदर्श' घोटाळ्यातून चव्हाण यांचं नाव वगळण्याबाबत सीबीआयनं केलेली याचिका आज (बुधवारी) मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. तत्कालीन राज्यपालांनी चव्हाण यांची चौकशी करण्यास नकार दिल्याने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव वगळावे अशी सीबीआयची भूमिका होती. या याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी झाली असता हायकोर्टाने आरोपींच्या यादीतून चव्हणांचं नाव वगळण्यात नकार दिला आहे
मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहिदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लाटल्याचं उघड झालं होतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला असून त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
घटनाक्रम
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, CBI, अशोक चव्हाण