Home /News /news /

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची धुलाई

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची धुलाई

01 नोव्हेंबर : इचलकरंजी शहरात शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका नराधम युवकाला नागरीकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केलंय. इचलकरंजी शहरातल्या घोडकेनगर भागात राहणार्‍या सादिक लाडखान या युवकानं शाळकरी मुलीला घरातली भांडी घासण्याच्या निमित्ताने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळी शेजारच्या नागरिकांना याची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी या युवकाला बेदम चोप देत त्यांची शहरातून धिंड काढली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पीडित मुलगी ही 9 वी मध्ये शिकत असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलंय. दरम्यान, घोडकेनगर भागामध्ये अजूनही तणावाची परिस्थिती आणि या भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Kolhapur, Rape case, बलात्कार

पुढील बातम्या