Home /News /news /

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राहुल गांधी जाणार सुट्टीवर

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राहुल गांधी जाणार सुट्टीवर

4547Rahul_Gandhi

23 फेब्रुवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सुट्टीवर जाणार आहे. लोकसभा पराभवानंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य कसं आणता येईल, यावर या सुट्टीत राहुल गांधी विचार करतील, असं सांगितलं जातं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच ही माहिती दिली आहे. त्यामुळे राहूल बजेटच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत. राहूल यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाच्या गोटातून तर राहूल गांधींनी राजकारणातून कायमची सुट्टी घ्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शुक्रवारी नवी दिल्लीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेक अर्थांनी महत्त्वाच्या असणार्‍या या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कशाप्रकारे कामगिरी करणार याकडे, सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण, बजेटच्या पहिल्याच दिवशी राहूल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी होती. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांवर राहुल गांधी नाराज आहेत. जर राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाले तर त्या नेत्यांना आपलं पद सोडावं लागेल, असे संकेतच देण्यात आले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये होणार्‍या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या अधिवेशनात राहुल गांधी यांची अध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. त्याचं पार्श्वभूमीवर,राहुल यांनी सद्यस्थितीतील राजकीय वातावरण आणि काँग्रेस पक्षाची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात व्यक्त होण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आणखी काही वेळ मागितला आहे. त्यामुळे ते सुरूवातीचे काही दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित नसतील. याबाबत जेव्हा सोनिया गांधींना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी तयारीसाठी राहुल यांना काही वेळ हवा आहे. राहुल गांधी यांची संसदेतली उपस्थिती यापूर्वीही अनेक वेळा चर्चेत राहिली आहे. गेल्या अधिवेशनात जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावरून राहुल गांधी खूपच आक्रमक झाले होते. पण, जेव्हा चर्चा झाली. त्यावेळी मात्र ते गैरहजर होते. इतकंच नाही तर निर्भया प्रकरणावरच्या चर्चेवेळीही ते गैरहजर होते. आता राहुल गांधी सुट्टीवर चाललेत. पण, या सुट्टीमागे बरचं काही दडलंय. येणार्‍या काळात ते बाहेर येईलच. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Parliament session, Rahul gandhi, अर्थसंकल्पीय अधिवेशन, राहुल गांधी

पुढील बातम्या