मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अरविंद केजरीवालांवर एका महिलेचा शाई फेकण्याचा प्रयत्न

अरविंद केजरीवालांवर एका महिलेचा शाई फेकण्याचा प्रयत्न

dasdapy

नवी दिल्ली – 17 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका महिलेने शाई फेकली आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सम-विषम वाहतूक नियमांसंदर्भातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला आहे.

आम आदमी सेनेची सदस्य असल्याचा दावा या महिलेनं केला आहे. आम आदमी सेना ही आम आदमी पक्षाच्या स्वयंसेवकांचीच एक संघटना आहे. आम आदमी पक्षाने सीएनजीमध्ये घोटाळा केला असून त्यासंदर्भातील कागदपत्र आणि सीडीही आपल्याकडे असल्याचा दावा या महिलेने केला आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ती एकटी आहे, की अजून इतर कुणी सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करणार आहेत. दरम्यान, सहानुभूती मिळवण्यासाठी शाई फेकचा दिखावा केल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

[if0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Arvind kejriwal, अरविंद केजरीवाल