Home /News /news /

अम्याला सोडू नका, भिंतीवर आरोपीचं नाव लिहून बलात्कार पीडितेची आत्महत्या

अम्याला सोडू नका, भिंतीवर आरोपीचं नाव लिहून बलात्कार पीडितेची आत्महत्या

sangali_rape_Caseसांगली -08 ऑगस्ट : जिल्ह्यातल्या मिरजमध्ये बलात्कार पीडित महिलेनंआरोपीच्या शेतात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अमित कुरणे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी पीडितेनं अमित कुरणेला जिवंत सोडू नका असा भिंतीवर लिहून जीवनयात्रा संपवलीये.

अमित कुरणेनं पीडित महिलेवर एक महिन्यापूर्वी बलात्कार केला होता. या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात अमित कुरणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीही आरोपीला पोलिसांनी अटक केली नव्हती. उलट पोलिसांनी पीडित महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी मोकाट होता. तसंच पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्यानं तणावात असलेल्या महिलेनं आरोपीच्या शेतातल्या घरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी महिलेनं लिहिलेल्या चिट्ठीत आरोपी अमित कुरणेला जिवंत सोडू नका असंही म्हटलंय. तसंच भिंतीवरही अमोल कुरणेमुळेच आपण आत्महत्या करत असून त्याला सोडू नका असा संदेश लिहिलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Rape, Sangali, बलात्कार, सांगली

पुढील बातम्या