मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अमित शहा-जेटली काही देव नाहीत, मोदींच्या पदव्या बनावटच -आशुतोष

अमित शहा-जेटली काही देव नाहीत, मोदींच्या पदव्या बनावटच -आशुतोष

ashutosh409 मे : अमित शहा आणि अरुण जेटली हे देव नाहीत जे कोणतीही पदवी आणून दाखवतील आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवायचा. पंतप्रधानांच्या दोन्ही पदव्यांमध्ये रोल नंबर आणि नावांमध्ये तफावत असून पदव्या बनावट आहे असा पलटवार आपचे नेते आशुतोष यांनी केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदव्यावरुन वाद सुरू असून आज (सोमवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या बीए आणि एमएची पदवी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केली. यानंतर आपचे नेते आशुतोष यांनी पत्रकार परिषद घेऊ पंतप्रधानांची डिग्री बनावटच असल्याचं सांगितलं. माझ्याकडेही मोदींच्या दोन्ही पदव्या आहेत. आमच्या नेत्यांवरही बनावट पदव्यांचा आरोप झाला. कायद्याने काम केलं पाहिजे. पण अजून पर्यंत कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही. आज जे मोदींच्या पदव्यांचा दाखवत आहे. त्या अमित शहांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे आणि अरुण जेटलींवर डीडीए घोटाळ्याचा आरोप आहे असा घणाघात आशुतोष यांनी केलाय.

तसंच त्यांनी ज्या पदव्या दाखवल्या आहे. त्या बनावट आहे. अमित शहा आणि जेटली हे काही देव नाही. की त्यांनी काहीही दाखवावं त्यावर आम्ही विश्वास ठेवावा. मुळात बीएच्या पदवीवर नरेंद्र कुमार दामोदार दास मोदी लिहिलंय आणि एमएच्या पदवीवर नरेंद्र दामोदार दास मोदी लिहिलं आहे. ज्या वेळी नाव बदलावं लागतं त्यावेळी प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं मग नाव बदलंय तर प्रतिज्ञापत्र कुठे आहे असा सवाल आशुतोष यांनी उपस्थिती केला.त्याचबरोबर 1977 ची मार्कशीट दाखवण्यात आलीये तर पदवी 1978 ची कशी काय असू शकते ? असा सवालही आशुतोष यांनी उपस्थिती केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: AAP, BJP, अमित शहा, अरविंद केजरीवाल, अरुण जेटली, आप