26 फेब्रुवारी : मुंबईतल्या अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलंय.यात दिसणाऱ्या दृश्यांमध्ये एका व्यक्तीला त्याच्याच कार्यालयात घुसून ४ जणांनी बेदम मारहाण केलीय. मात्र त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले तीन चार जण मात्र नुसती बघ्याची भूमिका घेत उभे आहेत.
मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आदित्य असं असून मारहाण करणाऱ्या एकाही व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान या मारहाण प्रकरणी अंधेरी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून अन्य दोघांचा शोध अद्यापही सुरूच आहे.या मारहाणीमागे नक्की काय कारण आहे याचाही पोलीस शोध घेतायत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.