04 जानेवारी : अफगाणिस्तानच्या 'मजार-ए-शरीफ' या भागात असलेल्या भारतीय दुतावासावर आज (सोमवारी) सकाळी पुन्हा दहशतवादी हल्ला करण्यात आला. गोळीबार आणि स्फोटाच्या आवाजाने भारतीय दुतावास हादरून गेलं. अफगाण सुरक्षा दल आणि इंडो तिबेटन सुरक्षा दलाच्यावतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.
रविवारी रात्री चार दहशतवाद्यांनी भारतीय दुतावासावर हल्ला करत गोळीबार केला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. मात्र, अन्य दोन दहशतवादी परिसरात लपून बसल्याने त्यांचा शोध लागला नव्हता. या हल्ल्यात दुतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा भारतीय दुतावासावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान स्पेशल फोर्सने तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याच्या जबाबदारी स्वीकारलेली नाही.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: अफगाणिस्तान