मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अपघातात चिमुरड्यांची ताटातूट

अपघातात चिमुरड्यांची ताटातूट

05 मे : दिवा सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातामुळे नाकती कुटुंबियांची ताटातूट झाली आहे. या कुटुंबातल्या तीनही मुलींवरच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं आहे. वडिलही गंभीर जखमी झालेत तर तीनही बहिणी तीन वेगवेगळ्या शहरांतल्या हॉस्पीटल्समध्ये उपचार सुरू आहेत. सगळ्यांत छोटी 3 महिन्यांची मनस्वी नाकती हिच्यावर रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर अडीच वर्षांची बहीण समृद्धीवरही सायन हॉस्पीटलमध्येच उपचार होतायेत. या तिघींमधली सगळ्यांत मोठी बहीण 4 वर्षांची जान्हवी हिच्यावर वाशीच्या MGM हॉस्पिटलमध्ये उपचार होतायेत. मूळचं म्हसळा इथलं हे नाकती कुटुंब पनवेलहून म्हसळा इथं जाण्यासाठी निघाले होते.माणगावला उतरुन ते म्हसळ्याला जाणार होते. आज दुपारी या तिन्ही मुलींच्या आईवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
First published:

Tags: Aacident, Accident, Diva-sawantwadi passenger, Kokan railway, Kokan railway accident, Konkan, Nagothane, Railway, Railway accident, Roha, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर

पुढील बातम्या