मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही सहभागी - किरीट सोमैया

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवारही सहभागी - किरीट सोमैया

Ajit Pawar And Kirit Somaiya

मुंबई – 15 एप्रिल :   अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यात अजित पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. अजित पवार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सुमारे 20 नेत्यांवरही सोमैया यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत प्रचारासाठी वापरल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे. तसंच यावेळी सोमैय्या यांनी 64 बोगस आणि खरे लाभाथीर्ंची यादी जाहीर केली आहे.

या घोटाळ्याबाबत सर्व पुरावे किरीट सोमैया यांनी आज (शुक्रवारी) दिल्लीतील ईडीच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. या प्रकरणातील बडे मासे लवकरच तुरुंगात दिसतील असंही सोमैयांनी यावेळी म्हटलं आहे.

या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर आरोप केला होता. अजित पवारच या घोटाळ्याला कारणीभूत असून त्यांच्या आशीर्वादानेच भ्रष्टाचार झाल्याचं सोमैया यांनी म्हटलं होतं. तसंच या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांचा सहभागी असल्याचंही ते म्हणाले होते.

सोमैय्यांनी आज सादर केलेल्या यादीत राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, मधुकर पिचड, जयंत पाटील, नवाब मलिक, अरूण गुजराथी, विद्या चव्हाण, चंद्रशेखर घुले पाटील, शंकर गडाख पाटील, नितीन देशमुख यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व आमदार रमेश कदम सध्या तुरुंगात आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Ajit pawar, NCP, Sunil tatkare, अजित पवार, सुनील तटकरे