06 जुलै : सांगली महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत कलगीतुरा रंगलाय. शुक्रवारी प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पतंगराव कदम आणि माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर जहरी टीका केली होती. त्यावर या नेत्यांनी उत्तर दिलंय. अजित पवारांच्या टीकेला आपल्या लेखी शून्य किंमत आहे. राजकारणात त्यांच्यापेक्षा आपला अनुभव जास्त असल्याचं पतंगराव कदमांनी म्हटलंय. तर माझ्या राजकीय सातबारावर माझंच नाव आहे. शरद पवारांचं नाव सातबारावर नसतं तर अजित पवार कुठं असते? असा सवाल माणिकराव ठाकरेंनी विचारलाय. दुसरीकडे मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असं ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी आयबीएन-लोकतमशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.