मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अखेर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची 'आप'मधून हकालपट्टी

अखेर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची 'आप'मधून हकालपट्टी

21prashant bhushan and yadav एप्रिल : अखेर आम आदमी पक्षातून योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत योगेंद्र यादव यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाही म्हणून अखेर हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यासह प्रो. आनंदकुमार आणि अजित झा यांचीही हकालपट्टी करण्यात आलीये. दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यानंतर आपमध्ये पक्षाअंतर्गत कलहाने डोकंवर काढलं होतं. त्यामुळे आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटी म्हणजेच राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, त्यांचं पक्षाचं सदस्यत्व कायम ठेवण्यात आलंय. मात्र, पुढे केजरीवाल विरुद्ध योगेंद्र यादव असा वाद चिघळला. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर पक्षाविरोधात काम करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अखेरीस आज पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: AAP, Arvind kejriwal, आप, आम आदमी पार्टी, योगेंद्र यादव

पुढील बातम्या