मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अखेर मुंबईचा विकास आराखडा रद्द, नव्याने होणार सादर

अखेर मुंबईचा विकास आराखडा रद्द, नव्याने होणार सादर

cm on mumbra21 एप्रिल : मुंबई विकास आराखड्यावरून मोठ्या वादंगानंतर अखेर विकास आराखडाच रद्द करण्यात आलाय. नव्याने मुंबईचा विकास आराखड सादर करण्यात येणार आहे असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहे. येत्या 4 महिन्यांत हा विकास आराखडा सादर केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेनं मुंबईसाठी विकास आराखडा सादर केला होता. मात्र, या विकास आराखड्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं या विकास आराखड्याला कडाडून विरोध केला होता. तसंच मनसेनंही या विकास आराखड्याला विरोध केला होता. हा विकास आराखडा मराठी जणांना मुंबईतून हकलण्याचा डाव आहे असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला होता. सर्व स्तरातून विरोध असल्यामुळे अखेरीस राज्य सरकारने विकास आराखडा रद्द करण्याचे महापालिकेला आदेश दिले आहे. तसंच येत्या चार महिन्यांत नव्याने आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विकास आराखडा हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेला निर्देश देऊन नव्याने विकास आराखडा तयार करायला सांगितला आहे. चुका सुधारून नव्याने आराखडा तयार करावा असे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कलम 154 अंतर्गत महापालिकेला हे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईकरांच्या आराखड्याबद्दल काही हरकती, सूचना मागवाव्यात असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. नवा विकास आराखडा तयार झाल्यानंतर जुना आराखडा रद्दबातल होईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Mumbai, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, राज्य सरकार, विकास आराखडा